Monday, March 30, 2015




नगर येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांचे आक्रमण

हिंदूंसह पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक; ४ घायाळ
काँग्रेसप्रमाणे भाजपच्या राज्यातही हिंदूंवर धर्मांधांची आक्रमणे होत असतील, तर नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले 'चांगले दिवस' (अच्छे दिन) येण्याऐवजी 'वाईट दिवस'च (बुरे दिन) येतील !
भारतात ठिकठिकाणी छोटे पाकिस्तान निर्माण होत 
असल्याचे दर्शवणारी घटना ! हिंदूंनी अन्य पंथियांच्या मिरवणुकांवर दगडफेक केल्याचे 
वृत्त कधी ऐकले आहे का ? 
नगर, २९ मार्च - शहरात श्रीरामनवमीनिमित्त हिंदु राष्ट्र सेनेने प्रथमच आयोजित केलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. (हिंदूंवर आक्रमण करण्याची एकही संधी न सोडणारे कुरापतखोर धर्मांध ! - संपादक) कोतवाली पोलीस ठाण्याजवळच ही घटना घडली. दगडफेक होत असतांना पोलिसांनी २-३ जणांना कह्यात घेऊन मिरवणुकीला मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला; परंतु पुढेही दगडफेक झाल्यामुळे सर्वत्र पळापळ झाली. यात २ पोलिसांसह ४ जण घायाळ झाले असून पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली आहे. (स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? - संपादक)
१. हिंदु राष्ट्र सेनेने श्रीरामनवमीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला प्रारंभ केला. ढोलताशा, भगवे ध्वज आणि श्रीरामाची मूर्ती असे स्वरूप असलेल्या या मिरवणुकीत २ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.
२. सायंकाळी ६ वाजता मिरवणूक पंचपीर चावडी भागात आल्यावर नमाजाची वेळ असल्यामुळे धर्माभिमान्यांनी वाद्यांचा गजर स्वतःहूनच बंद केला. नमाजानंतर मिरवणूक पुन्हा चालू झाली. (हिंदूंच्या या सहिष्णूतेचा धर्मांध अपलाभ उठवतात, हेच संतापजनक ! - संपादक)
३. आशा चित्रपटगृहाच्या चौकामध्ये मिरवणूक आल्यावर काही कार्यकर्ते जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा देत भगवे ध्वज फडकवत होते. त्या वेळी बाजूलाच असलेल्या मशिदीतून मिरवणुकीवर चप्पल आणि बाटली फेकण्यात आली. (मुसलमानांना या देशात दुजाभावाची वागणूक मिळते, असा कांगावा करणार्याना या धर्मांधांच्या उद्दामपणाविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक)
४. यातच दगडफेक होऊन दंगल झाल्याने व्यापार्यांनी दुकाने तात्काळ बंद केली.
५. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवण्यास प्रारंभ केला. राज्य राखीव पोलीस दलाचे पथक आणि स्थानिक पोलीस यांनी ८ जणांना कह्यात घेतले.
६. त्यानंतरही शहरात पुन्हा दगडफेक चालू झाल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी अतिरिक्त पोलीस दल बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली असून पोलिसांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
(संदर्भ दैनिक सनातन प्रभात)

No comments:

Post a Comment