Wednesday, December 24, 2014

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।
हिंदु राष्ट्र सेनेचे स्वप्नील जागुष्टे यांना मध्यरात्री ९ समाजकंटकांकडून अमानुष मारहाण
छायाचित्रात समाजकंटकांनी स्वा. सावरकर यांची खाली पाडलेली प्रतिमा आणि त्याच्या 
बाजूला फाडून टाकलेले सनातन पंचांग
• स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा फोडली
• सनातन पंचांग फाडले
हिंदूबहुल देशात हिंदूंवर आक्रमण व्हायला, हा भारत आहे कि पाक ? हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आक्रमण करणार्‍या अशा समाजकंटकांना कायमचा धडा शिकवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
ठाणे - येथील पाचपाखाडी भागातील हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. स्वप्नील जागुष्टे यांना २० डिसेंबरच्या मध्यरात्री ९ समाजकंटकांनी घरात चर्चेच्या निमित्ताने घुसून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्याचे काम चालू आहे.
(हिंदूंनो, अशा समाजकंटकांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! एका हिंदूच्या घरात घुसून मारहाण करणारे समाजकंटक कधी धर्मांधांच्या कुकृत्यांविषयी आवाज उठवतात का ? हिंदूंच्या केसालाही धक्का लावायचे कोणाचे धाडस होणार नाही, यासाठी हिंदु राष्ट्र स्थापण्याला पर्याय नाही ! - संपादक)
समाजकंटकांनी फोडलेली स्वा. सावरकर यांची प्रतिमा
१. श्री. जागुष्टे हे हिंदु राष्ट्र सेनेचे कृतीशील कार्यकर्ते आहेत. माता-पित्यांच्या मृत्यूनंतर श्री. जागुष्टे ठाण्यात एकटेच रहातात. त्यांचे बंधू अन्य ठिकाणी रहातात. 
२. श्री. जागुष्टे हे व्हॉट्स अ‍ॅपवरून वैचारिक लिखाण करत असत. ते लिखाण एका व्यक्तीला पटत नव्हते. त्यांच्यात सातत्याने वैचारिक लिखाणाद्वारे मतप्रदर्शन केले जात होते. या संदर्भात समाजकंटकांपैकी एकाने श्री. जागुष्टे यांना हिंदुत्वाचे काम सोडून दे, अशी धमकीही दिली होती. 
३. नुकतेच पनवेल येथे पंडित नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यावरून दूरचित्रवाहिनीवर एक चर्चासत्र झाले. त्यामध्ये श्री. जागुष्टे यांची बाजू मांडणारे आणि विरोधक यांचा सहभाग होता. 
४. त्याचा राग आल्याने २० डिसेंबरला रात्री १ वाजता व्हॉट्स अ‍ॅपवर वाद घालणारा समाजकंटक एका मित्रासह श्री. जागुष्टे यांच्या घरी आला. त्यांनी सांगितले की, आज आपण चर्चा करून काय तो निकाल लावून टाकू. या वेळी ते दोघेही मद्यपान करून आले होते. 
५. चर्चा चालू असतांना एकेक करून एकूण ९ समाजकंटक घरात घुसले. 
६. त्यांनी श्री. जागुष्टे यांना दमदाटी चालू करून मारहाण करण्यास प्रारंभ केला. काही जणांनी घरातील साहित्याची नासधूस केली. त्यामध्ये सनातन पंचांग, श्री अनंतानंद साईश यांचे चित्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा, त्यांचा ग्रंथ आदींची मोडतोड केली.
७. जर कुणाला सांगितले किंवा पोलीस ठाण्यात गेला, तर तुला कुठे अदृश्य (गायब) करू ते समजणारही नाही !, अशी धमकी देऊन ते निघून गेले. 
८. या संदर्भातील माहिती हिंदुत्ववाद्यांना दिली आहे. त्यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. श्री. जागुष्टे आणि त्यांचे सहकारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत आहेत.
दैनिक सनातन प्रभात 
मंगळवार, पौष शुक्ल पक्ष द्वितीया, 
२३ डिसेंबर २०१४ कलियुग वर्ष ५११६

 #swapnil_jaghuste #Hindurashtra_sena

Wake Up HIndus ! Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP ! 

#Dhananjay #Bhai #Desai 
#HinduRashtra #sena #हिन्दुराष्ट्र #सेना #Plotical #party 
#election #Hindutva #Quotes #Youth #Proud #Sanskriti #swadeshi #Bharat #Sambhaji #raje #Shivaji #History 

l जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l"


No comments:

Post a Comment