Wednesday, March 4, 2015




आपल्या देशाचे पश्चिमेस जो समुद्र आहे त्यास आपण अरबी समुद्र म्हणता. 
ह्या समुद्राला हे नाव कोणी दिले? युरोपियनांनी! ते युरूपमधून हिंदुस्थानांत येताना त्यांना प्रथम अरबस्तान लागते आणि नंतर हा समुद्र. म्हणून त्यांनी ह्याला अरबी समुद्र म्हटले. 
इंग्रजांनी ते नांव दिले म्हणून त्यास आपणही त्याच नावांने का संबोधावे? अरबी समुद्र म्हणजे काय तो अरबांच्या बापाचा आहे? तो आपलाही समुद्र आहे. आपल्या देशाचे पश्चिमेस तो आल्यामुळे त्यास पश्चिम समुद्र म्हणावे. पूर्वेचा तो पुर्व समुद्र किंवा गंगासागर दक्षिणेचा तो हिंदुमहासागर. 
हिदीमहासागर नव्हे! एखाद्या घरात घुशी, उंदीर, झुरळे, मुंग्या आदी प्राणी जरी रहात असलेत तरी ते घर त्यांचे नव्हे तर ते त्या घरधन्याचे ज्याप्रमाणे असते, त्याप्रमाणे या देशांत जरी कितीही इतर लोक असले तरी देश हिंदूंचाच आहे. हिंदुस्थान आहे म्हणून हिंदुमहासागर आहे. 
आपल्या भूगोलांत या प्रमाणेच नांवे लिहली गेली पाहिजेत. इंग्रजांनी आपल्या देशांतील गावांची नि नद्यांची बदलेली नांवे आपण पुन्हा बदललीच पाहिजेत. त्यांत ऊणेपणा काहीही नाही. 
जगातील इतर देशांनीही हेच केले आहे. रशियाने तर क्रांतीनंतर आपल्या सेंट पिटरचे गावाचे नाव पालटून ते लेनिनग्राड केले; दुसरे स्टलिनग्राड झाले. 
आपणही आपल्या भाषेचा आणि देशाचा अभिमान बाळगून परकीय नांवे पालटून ती स्वकीय केली पाहिजेत.

No comments:

Post a Comment